वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे आणि अत्यंत मुरलेले राजकारणी या नात्यानं त्यांचे स्वभावविशेष या दोहोंचा शोध या पुस्तकात घेतला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्यांबरोबरच्या त्यांच्या नात्याचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याला पूरक असलेल्या उपसंस्थांबरोबरील त्यांच्या तिरस्कार आणि प्रेम या दोन किनाऱ्यांमधोमध दोलायमान होत असलेल्या विरोधाभासी संबंधांचा सखोल आढावा यात मिळतो. संपूर्ण संशोधनांती सत्र घटनांच्या आधारे लिहिलेलं आणि अंतःस्थ कथा आणि घटना, अंतरंगाचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या मुलाखती आणि सरकारी दफ्तरातील फोटो यांमुळे वाचनीय झालेलं हे पुस्तक या कवी मनाच्या राजनीतिज्ञाच्या आयुष्याचं आणि काळाचं दर्शन घडवणारं कवाड उघडून देईल.
อัตชีวประวัติและบันทึกชีวิต