माझ्या दृष्टीनं - माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ - पवित्र ग्रंथाला कुरतडणार. तो ल्युसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांच रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु या सर्वांहून अधिक भयंकर होतं. त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं - अल्लाजवळ पोचू शकणारा - आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.