रूट्गर ब्रेगमन युरोपातले तरुण, लक्षवेधी इतिहासकार आहेत. युटोपिया फॉर रिअॅलिस्ट्स या त्यांच्या पुस्तकास संडे टाइम्स आणि न्यू यॉर्क टाइम्सने सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत स्थान दिलं आहे. त्या मूळ डच पुस्तकाचा एकूण 32 भाषांत अनुवाद झाला आहे. द कॉरसपाँडंटमधील कामासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युरोपियन प्रेस प्राइझ’ या पुरस्कारासाठी त्यांना दोन वेळा नामांकन देण्यात आलं होतं. 2020च्या बिग इश्यूच्या टॉप 100 चेंजमेकर्सच्या यादीत त्यांचं स्थान दहाव्या क्रमांकावर आहे.