विनोद निर्मिती हा ज्ञान, अनुभव आणि चिंतनावर आधारित गंभीर उद्योग आहे. विनोद माणसाला तणावमुक्त करतो.
करमणुकीतून आनंद मिळतो.विनोद वाचायला आणि सांगायला सोपा हवा. श्री अरविंद घोष यांनी माणसाला विनोद
बुद्धी नसती तर जग पेटले असते असे म्हटले आहे. विनोद उत्साहाची लहर निर्माण करतो. माणसाला चेहऱ्यावर
आठ्या घालायला७२ तर हसायला फक्त१४ स्नायूंची हालचाल करावी लागते. तुम्हाला हसवणाऱ्याकडे तुम्ही रागाने
बघू शकत नाही. विनोद लोकशाहीवादी आहे. कुणीही सांगू शकतो. तणावमुक्त जगणं,निर्मितीची प्रेरणा, परस्पर संबंध
सुधारणा,समस्या सोडवणूक,संवादात वाढ या बाबी विनोद निमितीमुळे सहज शक्य होतात.हसा तुमच्याबरोबर जग
हसेल हीच आपली जगण्याची मध्यवर्ती भूमिका हवी.
संजय थोरात
ताण तणावांवर मात करून विनोद हास्य निर्मिती करतो. हास्य दोन व्यक्तींमधील अंतर कमी करते. आपण आपल्या YouTube Channel च्या माध्यमातून हसा, तुमच्याबरोबर जग हसेल ही भूमिका घेत विनोदी चुटक्यांची प्रसन्न मैफिल, दंभस्फोट करून उपहास आणि उपरोधाच्या माध्यमातून एकोळी सादरीकरण, वाचन संस्कृतीचे बहुआयामी तपशील, साहित्य संस्कृतीच्या घडामोडींचा वेध आणि वक्ते जन्माला येत नाहीत तर घडावे घडवावे लागतात हे सूत्र केंद्रवर्ती ठेऊन ' वक्तृत्व ' विषयावर व्ही. डी. ओ. मालिका सादर करीत आहोत. विचार आणि विनोदाचे बेमालूम मिश्रण ठरलेले हे व्ही. डी.ओ. अल्पावधीत प्रेक्षकप्रिय ठरले आहेत. विनोदाची प्रसन्न पखरण असलेल्या या व्ही. डी.ओ. मालिकेचा आपण लाभ घ्यावा ही विनंती.
Dr. Sanjay Thorat हे नेहमीपेक्षा वेगळा संवाद साधणार चॅनेल आपण Like, Comment, Share व Subscribe करा ही विनंती.
https://youtube.com/channel/
Amrut Patil
Mo. No. 7588088558